बीड- येथील एका शेतकऱ्याने खाजगी सावकाराकडून ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज परत केले तरीदेखील संबंधित सावकार पैशाची मागणी करत असल्याने एका 29 वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बीड येथे बुधवारी घडली.
सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
एका शेतकऱ्याने खासगी सावकाराकडून पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज परत केले तरीदेखील संबंधित सावकार पैशाची मागणी करत असल्याने एका २९ वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बीड येथे बुधवारी घडली.
सुदाम अंगदराव फफाळ (29, रा. बेलोरा ता. माजलगाव) असे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालयात सुदाम यांच्यावर उपचार सुरू आहेत. ४ दिवसांपूर्वी सुदाम यांना गावातीलच एका सावकाराने व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशासाठी सावकाराने तगादा लावला होता. व्याजाचे पैसे सुदाम यांनी चुकते केले होते. मात्र तरीही ते पैसे सावकार पुन्हा मागत होता. या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. शेतकऱ्याने संबंधित खासगी सावकाराकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. अशी माहिती सुदाम याचा भाऊ गणेश फफाळ याने दिली आहे.