बीड : वडवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रेवन्नाथ गंगावणे यांचा एका गावातील शिक्षकाच्या भावाशी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. या कारणावरून यांची विरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही एनसी निकाली काढण्यासाठी रेवननाथ गंगावणे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली; मात्र तडजोडी अंती 10 हजार रुपये रक्कम ठरली व 10 हजार रुपयांची लाच घेताना गंगावणे यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई उस्मानाबादचे उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली आहे. या अगोदर देखील बीड जिल्ह्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.
Police Bribery Case: बीड जिल्ह्यात दोन दिवसात दोन पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
बीडच्या वडवणी येथील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिवाजी श्रीराम सानप (वय 41) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरी घटना दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रेवननाथ गंगावणे या कर्मचाऱ्याला तक्रारदारास मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
ग्रामसेवक व तलाठीही मागतात लाच:विशेष म्हणजे वडवणीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी एक तलाठी व ग्रामसेवक यांना देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. ही घटना ताजी असताना देखील याचा शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कसलाही परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा असताना देखील हे कर्मचारी लाच मागतातच कशासाठी? हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
बीड एसीबीची कारवाई:बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या असून यात पोलीस विभाग पुढे असल्याचे जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी वडवणी पोलीस ठाण्यात घटना उघड झाल्यानंतर परत आज शिरुर पोलीस ठाण्यातील घटना समोर आली आहे.शिरुर पोलीस ठाण्यातील शिवाजी श्रीराम सानप (वय 41) यांनी संबंधित तक्रारदाराकडून अदखपाञ गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती 5 हजारात तडजोड झाली. तडजोड झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सानप यांना ताब्यात घेत गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांब, पोलीस अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी व त्यांच्या टिमने केली.
हेही वाचा: