बीड- कोरोनाच्या बदलत्या स्वरूपा संदर्भात अभ्यास करणारे केंद्र सरकारच्या आयसीएमआर संस्थेचे 20 सदस्य असलेले एक पथक शुक्रवारी बीडमध्ये दाखल झाले. हे पथक जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील निवडक नागरिकांचे रक्तनमुने घेऊन त्यावर संशोधन करणार आहे.
नियमित संशोधन आणि शरीरातील अँटी बॉडीज, तसेच कोरोनाचे बदलते स्वरूप यासाठी आयसीएमआर ही संस्था काम करते. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी हे पथक बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाने रक्त नमुने घेण्याचे काम प्रत्यक्षात सुरू केले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले.
संशोधनासाठी 'आयसीएमआर'चे पथक बीडमध्ये दाखल; जिल्ह्यातील नागरिकांच्या रक्त नमुन्यांचा करणारा अभ्यास - ICMR team in beed
केंद्र सरकारच्या आयसीएमआर संस्थेचे हे पथक जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील निवडक नागरिकांचे रक्तनमुने घेऊन त्यावर संशोधन करणार आहे.
icmr team
हे पथक प्रत्येक तालुक्यातील ठराविक प्रभागातील किमान 40 ते 50 नागरिकांच्या रक्ताची चाचणी घेत आहेत. प्रत्येक पथकात संस्थेच्या दोन सदस्यांसह तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी समाविष्ट आहेत. बीडसह मराठवाड्यातील इतर तीन जिल्ह्यात ते जाणार आहेत.