बीड- जिल्ह्यातील माजलगाव येथील केसापुरी येथे पत्नीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
पतीचा पत्नीवर चाकू हल्ला, बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू - बीड जिल्हा रुग्णालय
पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बीड येथील केसापुरी येथे घडली. पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचलं का? -'माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल, तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आभार'
केसापुरी येथे कैलाश राठोड हा पत्नी पूजा राठोडसोबत राहत होता. दोघेही ऊसतोड मजूर आहेत. संबंधित महिलेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून कैलाश पत्नी पूजाला मारहाण करीत होता. याबाबत त्याला वारंवार समज देण्यात आली. मात्र, तो मुलीचा छळ करीत होता. शेवटी तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने तिच्यावर वार केल्याचा आरोप संबंधित महिलेच्या आईने केला आहे. तसेच तिचा पती अद्यापही मोकाट असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.