बीड- हम भारतीय पक्षाने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ५ उमेदवार उभे केले होते. आता या पक्षाने विधानसभेसाठीही तयारी सूरू केली असून वंचित बहुजन आघाडी सोबतच हम भारतीय पक्षाला 'ऊस शेतकरी' हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असून याच चिन्हावर आम्ही महाराष्ट्रात शंभर जागेवर निवडणूक लढणार आहोत, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
हम भारतीय पक्ष लढवणार 100 जागा; निवडणूक आयोगाकडून मिळाले 'ऊस-शेतकरी' चिन्ह - पत्रकार परिषद
हम भारतीय पक्षाला निवडणूक आयोगाकडून मिळाले ऊस-शेतकरी चिन्ह मिळाले असून पक्षाकडून विधानसभेसाठी 100 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभेवेळी उत्तर-मुंबई, पुणे, नागपूर, बीड, हिंगोली येथील जागेवर उमेदवार उभे केले होते. यावेळी त्या उमेदवारांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. विधानसभेत पुणे जिल्ह्यातून सहा, मुंबई विभागातून वीस, अहमदनगर जिल्ह्यातून पाच, औरंगाबाद जिल्ह्यातून तीन, नागपूर जिल्ह्यातून पाच, सोलापूर जिल्ह्यातून दोन, बीड जिल्ह्यातून दोन, चंद्रपूर जिल्ह्यातून दोन, गडचिरोली जिल्ह्यातून दोन, नाशिक जिल्ह्यातून पाच, नंदुरबार जिल्ह्यातून पाच, जळगाव जिल्ह्यातून दोन, धुळे जिल्ह्यातून दोन,बुलढाणा जिल्ह्यातून दोन, परभणी जिल्ह्यातून दोन, नांदेड जिल्ह्यातून दोन, लातूर जिल्ह्यातून दोन, कोल्हापूर जिल्ह्यातून दोन, सांगली जिल्ह्यातून दोन, हिंगोली जिल्ह्यातून दोन, सातारा जिल्ह्यातून एक व इतर ठिकाणच्याही जागा लवकरच ठरतील. पूर्ण ताकदीनीशी आम्ही निवडणूक लढवू, असे पक्षाच्या उपाध्यक्षा डॉ. वंदना बेंजामिन यांनी सांगितले. या पक्षाला सर्व जाती-धर्माच्या संघटना, शेतकरी संघटना व ख्रिश्चन समाजाची सर्वांत मोठी संघटना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा पाठिंबा आहे.
यावेळी ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे, मुंबई अध्यक्ष अॅण्ड्रू फर्नांडीस, डॉ. वंदना बेंजामिन, विठ्ठल गायकवाड, अशोक थोरात, आनंद म्हाळूगेकर, विदर्भ संघटक प्रकाश बेंजामिन, विल्यम चंदनशीव, प्रमोद बोधक, दानिएल ताकवाले, उपाध्यक्ष राजू थोरात, सुनिल, सायमन, जयंत रायबोर्डे, राज एडके हे उपस्थित होते.