महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोग्य उपसंचालकांची बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; दांडी मारणाऱ्या डॉक्टरांना नोटीस - बीड

जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना सेवा मिळत नसल्याने आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यानुषंगाने सोमवारी लातूर विभागाचे आरोग्य उपचसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात अचानक तपासणी केली.

रुग्णांची भेट घेताना आरोग्य उपसंचालक

By

Published : Jun 4, 2019, 8:10 AM IST

बीड -जिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक भेट दिली. येथे त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील काही विभागांचे डॉक्टर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

आरोग्य उपसंचालकांच्या अचानक भेटीदरम्यान रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना सेवा मिळत नसल्याने आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यानुषंगाने सोमवारी लातूर विभागाचे आरोग्य उपचसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात अचानक तपासणीस सुरुवात केली. आंतररुग्ण विभागासह बाह्यरुग्ण विभागाला त्यांनी भेट दिली. यावेळी अस्थि व बालरोग विभागातील डॉक्टर गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.

सर्वच विभागात रुग्णांची गर्दी होती. काही वॉर्डांमध्ये दाटीवाटीने रुग्ण उपचार घेत होते. गुटखा, पिचकाऱ्यांनी रंगलेले कोपरे, केरकचरा, घाण पाणी यामुळे वॉर्डांमध्ये दुर्गंधी सुटली होती. हे चित्र पाहून डॉ. माले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. रुग्णांना अद्यावत आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरीदास, अधिसेविका मंदाकिनी खैरमोडे यांची उपस्थिती होती.

आरोग्य उपसंचालकांनी केलेल्या सुचना -

  1. जिल्हा रुग्णालयातील काही स्वच्छतागृहे बंद आहेत. त्यामुळे अस्वच्छतेमध्ये भर पडली आहे. बंद असलेली स्वच्छतागृहे तत्काळ सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवा. दुरुस्ती कामे प्राधान्याने करून घ्या. शिवाय रुग्ण आणि नातेवाईकांसाठी पिण्यासाठी शुध्द पाण्याची सोय करा, असे आदेश उपसंचालकांनी दिले.
  2. रूग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना सुरक्षारक्षकांनी हात जोडून नमस्कार करावा. त्यांची तपासणी करूनच त्यांना पास देऊन आत प्रवेश द्या. त्यांच्याकडे आढळणारे तंबाखू, गुटखा आणि धुम्रपानासंबंधी साहित्य काढून घ्या. समुपदेशन करून जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी दिला. शिवाय रुग्णालयात रोज स्वच्छतेची शपथ द्या, असे निर्देशही त्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details