महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hanuman Mandir Pendgaon: बीडमधील 'या' ठिकाणी आहे एकाच मंदिरात दोन हनुमानाच्या मूर्ती; जाणून घ्या, सविस्तर - Two idols of Hanuman in one temple

बीड जिल्हा हा देवी-देवतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देवी देवतांचे मंदिर या ठिकाणी आहेत. प्रत्येक मंदिराची आख्यायिका ही वेगवेगळी असल्याने या ठिकाणी लोक मनोभावे या देवांची पूजा अर्चा करतात. येथे दोन हनुमानाच्या मूर्ती असलेले हनुमान मंदिर आहे, त्याबद्दल जाणून घेवू या.

hanuman Mandir Pendgaon
पेंडगाव या ठिकाणचे हनुमान मंदिर

By

Published : Mar 26, 2023, 10:07 AM IST

Updated : Mar 28, 2023, 8:26 AM IST

पेंडगाव या ठिकाणचे हनुमान मंदिर

बीड : बीडपासून काही अंतरावर असलेल्या पेंडगाव या ठिकाणचे हनुमान मंदिर आहे, ते काशीवरून आलेले हनुमान या ठिकाणी थांबलेले आहेत. पूर्वीच्या काळचा त्याचा इतिहास आहे की, या ठिकाणचे काही लोक यात्रेनिमित्त काशीला जायचे. मात्र त्या ठिकाणच्या हनुमानाचे दर्शन घेऊन या गावातील लोक परत आले. मात्र भक्त असणाऱ्या व्यक्तीच्या मागे हे हनुमान आले. या ठिकाणी थांबले. या मंदिरात दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत.


भक्ताला पावणारा मारुती : मारुती काशीवरून गाईच्या खुरामध्ये आल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हा प्रत्येक भक्ताला पावणारा मारुती आहे. विशेष म्हणजे या मारुतीला (गोदावरी) त्र्यंबकेश्वरवरून निघालेल्या गंगेचे पाणी या चालत नाही तर काशीच्या गंगेचे पाणी या मारुतीला आणावे लागते. हनुमान जयंतीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते, असे भक्त रामराव गाडे यांनी सांगितले आहे.


काय आहे अख्यायिका :छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा मारुती या ठिकाणी आहे. या मारुती मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मारुती मंदिरामध्ये एकच मूर्ती असते, मात्र या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत. विशेष म्हणजे एक मारुती हा काशीवरून आलेला आहे. दुसरा पूर्वीचा गावचा मारुती आहे. त्यामुळे दोन्ही मूर्तीची स्थापना एकाच ठिकाणी केलेली आहे. गावातील 50 तरुण काशीच्या गंगेचे पाणी आणण्यासाठी गेले होते.

हनुमान जयंती : सहा एप्रिल रोजी होणारी हनुमान जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. हा नवसाला पावणारा मारुती असल्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रत्येक महिन्याला एक पंगत ठेवायचो. मात्र आता प्रत्येक शनिवारी ही पंगत या ठिकाणी ठेवत आहोत. याचे कारण असे आहे की, या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत. ते मोठ्या प्रमाणावर येतात. आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करतात. 2024 पर्यंत या ठिकाणी या पंगती बुक झालेल्या आहेत. प्रत्येक शनिवारी या ठिकाणी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे. शनिवारी या ठिकाणी चार ते पाच हजार लोक दर्शनासाठी येतात, असे गावकरी सुभाष गाडे यांनी सांगितले.




उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी :हा मारुती पुरातन काळापासूनचा ठिकाणी आलेला आहे. पूर्वीच्या काळी लोक काशीला जात होते, त्यावेळेस त्या ठिकाणावरून भक्ताच्या पाठीमागे हा मारुती या ठिकाणी आलेला आहे, शनिवारी मोठी पंगत या ठिकाणी होत आहे. मागील काही वर्षापासून गावातील लोक काशीच्या गंगेचे पाणी आणण्यासाठी जातात. प्रत्येक हनुमान जयंतीला मोठ्या उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी केली जाते, हे पाणी आणण्यासाठी 18 दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन पायी चालत काशीवरून पाणी घेऊन येतात, मनोभावी पाणी घालतात आणि त्या लोकांच्या इच्छा हा हनुमान पूर्ण करतो, असे भक्त राजाराम काळकुटे यांनी सांगितले आहे.



हनुमान जयंतीला भंडारा : हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी प्रत्येक हनुमान जयंतीला भंडारा घालायचे. आमटी आणि भात असे त्याचे स्वरूप होते. नंतर गावातील भाविक भक्तांनी येऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. या ठिकाणी लोक प्रत्येक शनिवारी येत असल्याने प्रत्येक शनिवारी सुद्धा यात्रा भरते. अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी पायी येत आहेत, असे विष्णु गाडे महाराज यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

Last Updated : Mar 28, 2023, 8:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details