महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट : अखेर शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश - अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान बीड बातमी

जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी या भागात गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस आणि येत्या चार दिवसांमध्ये वर्तवलेले पावसाचे अंदाज यावरून नुकसान अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट
'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट

By

Published : Sep 20, 2020, 4:09 PM IST

बीड : जिल्ह्यात सोयाबीन कापूस, तूर या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने शनिवारी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे वास्तवदर्शी वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

बीड, गेवराई, वडवणी सह अन्य जवळपास सर्वच तालुक्यात गेल्या दोन अधिक दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. कापूस व सोयाबीन या दोन प्रमुख पिकांना यामुळे मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. ह्याचे वास्तवदर्शी चित्रण 'ईटीव्ही भारत'ने प्रसारित करून शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या होत्या. याची दखल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी या भागात गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस आणि येत्या चार दिवसांमध्ये वर्तवलेले पावसाचे अंदाज यावरून नुकसान अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी किती तत्परता दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, येत्या दहा दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल वायकर यांनी दिला आहे.

हेही वाचा -बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; सोयाबीनसह इतर पिके पाण्यात, शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details