बीड- मागील अनेक वर्षांपासून होत असलेली छेडछाड व मानसिकरित्या त्रस्त झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने रविवार रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल - amit mane
वैष्णवीसोबत जवळीकता साधत तिच्या घराकडे सातत्याने दुचाकीवरून चकरा मारून पाठलाग करत तिचा विनयभंग केला. या आधीही तरुणांनी वैष्णवी आणि तिच्या वडिलांना धमक्या देत मानसिक त्रास देखील दिला.
वैष्णवी अशोक लव्हारे (वय १६, रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. तिच्या गावातील अमित साहेबराव माने (वय १९) याने रोहन गोविंद फड (वय १९) याच्या मदतीने संगनमताने वैष्णवीसोबत जवळीकता साधत तिच्या घराकडे सातत्याने दुचाकीवरून चकरा मारून पाठलाग करत तिचा विनयभंग केला. या आधीही तरुणांनी वैष्णवी आणि तिच्या वडिलांना धमक्या देत मानसिक त्रास देखील दिला. अखेर या त्रासाला कंटाळून वैष्णवीने रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरातील पत्र्याच्या आडुला गळफास घेतला.
ही घटना लक्षात येताच वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवून स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले असे वैष्णवीचे वडील अशोक अंबाजी लव्हारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात अमित माने आणि रोहन फड या दोघांवर विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बाळासाहेब मुळे हे करत आहेत. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.