महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार, चुलत पुतण्याचा आरोपींमध्ये समावेश - बीड जिल्ह्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार

अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिघांनी एका 24 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यातील एका गावात घडली आहे. अगोदर नात्याने चुलत पुतण्या असलेल्या तरुणाने बलात्कार करत व्हिडिओ बनवला होता. तर दुसऱ्या दिवशी अन्य तीन नराधमांनी तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केले. या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात एका नराधमावर बलात्काराचा तर तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 26, 2022, 10:10 PM IST

बीड - अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिघांनी एका 24 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यातील एका गावात घडली आहे. अगोदर नात्याने चुलत पुतण्या असलेल्या तरुणाने बलात्कार करत व्हिडिओ बनवला होता. तर दुसऱ्या दिवशी अन्य तीन नराधमांनी तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एका नराधमावर बलात्काराचा तर तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बीड ग्रामीण ठाण्यात आरोपी अजय भाऊसाहेब गवते याच्यावर बलात्काराचा तर पप्पू उर्फ प्रकाश नरहरी गवते, दत्ता मुरलीधर गवते, परमेश्वर नारायण गवते या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. याप्रकरणी चौघांवर भा.दं.वि.चे कलम 376 फ, 376 ड, 323, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. त्या बलात्काऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा -नवरदेव नाचण्यात मग्न; उशीर झाल्याने वधूपित्याने नवरीचे लग्न लावले दुसऱ्याच वरासोबत

ABOUT THE AUTHOR

...view details