बीड - गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीडचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी हा निकाल दिला.
सामूहिक बलात्कार प्रकरणात चौघांना जन्मठेप; पाच वर्षांपूर्वी घडली होती घटना - बीड क्राईम न्यूज
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीडचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरत प्रमुख सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलींद वाघिरकर यांनी बाजू मांडली.
हेही वाचा -जयपूर : आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी 4 जणांना अटक, 4.19 कोटींची रोकड जप्त
पाच वर्षांपूर्वी पाचेगाव ता. गेवराई येथील एका २२ वर्षीय महिलेवर ती शेतातून येत असताना एरंडगाव शिवारात पीडितेच्या घराजवळ सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी जिजा लालसिंग राठोड, अमोल मदन काष्टे, नवनाथ बाबुराव जाधव आणि कुंडलिक बन्सी राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. सदर प्रकरण बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण चालले. अभियोग पक्षाच्या वतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित महिलेसह वैद्यकीय अधिकारी, ओळख परेड घेणारे नायब तहसिलदार आणि तपासी उपविभागीय पोलीस अधिकारी गौरवसिंह यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
हेही वाचा -वाघांची शिकार करणारी टोळी गजाआड, मेळघाट क्राइम सेलची मोठी कारवाई