महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खरीपाचे पीककर्ज वाटपासाठी आष्टीत माजी आमदार भिमराव धोंडेंचे बँकेसमोर उपोषण

आष्टी येथील भारतीय स्टेट बॅकेच्या स्टेशन रोडच्या शाखेत सकाळी 11 वाजता शेतकऱयांच्या विविध मागण्या व पीककर्जासंदर्भात माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

dhonde
dhonde

By

Published : Feb 18, 2021, 9:44 PM IST

आष्टी (बीड) - शेतकऱयांना असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रधानमंञी कृषी सन्मान योजना सुरू केली. परंतु, बँक अधिकाऱयांच्या आडमुठ्या धोरणामुळे खरीपाचे पिककर्ज आठ महिने झाले तरी मिळाले नाही. त्यामुळे बँक अधिकाऱयांनी तात्काळ कसलीही दिरंगाई न करता कर्ज वाटप करावे, अशी मागणी माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केली.

माजी आमदार भिमराव धोंडे

आष्टी येथील भारतीय स्टेट बॅकेच्या स्टेशन रोडच्या शाखेत सकाळी 11 वाजता शेतकऱयांच्या विविध मागण्या व पीककर्जासंदर्भात माजी आमदार भिमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी सावता ससाणे, एन.टी.गर्जे, छगन तरटे, बाबासाहेब गर्जे, शंकर देशमुख, बाबुराव कदम यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आमदार धोंडे म्हणाले, या शाखेच्या गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत आहेत. त्यांना याबाबत आपण वारंवार सूचना देऊनही कसलाच कारभार सुधारत नसल्याने या ठिकाणी आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या शाखेने खरीपाचे कर्ज जुलै, ऑगस्टमध्येच वाटप करणे गरजेचे असून सुद्धा आठ महिने झाले तरीसुद्धा अजूनही कर्ज वाटप केले नाही. तसेच गोरगरीब निराधारांचे आलेले पगार देखील कर्ज खात्यात जमा करून घेऊन, शेतकऱयांच्या कर्ज खात्याला होल्ड लावत आहेत. जर बँक अधिकाऱयांना आपली कामे व्यवस्थित करता येत नसतील तर बदली करून जावे, परंतु शेतकऱयांचे नुकसान करू नये, असा सल्लाही धोंडे यांनी दिला.

यावेळी बँकेचे शाखाधिकारी अमितकुमार यांनी सांगितले की, आपण बँकेच्या नियमातच कामे करत असून, आता काही शेतकऱयांच्या खात्याला होल्ड लागला तर तो आमचा दोष नसून, कॅम्प्युटरवरच त्याची नोंद होती. तसेच काही खातेदारांचे सीबील खराब असल्याने त्यांचे कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यात बँक अधिकारी व कर्मचाऱयांचा काहीच दोष नसल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details