बीड - अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिलामुळे वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे सध्या असलेल्या पिकांना पाणी देण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडू नये, अशी विंनती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jayadutt Kshirsagar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Jayadutt Kshirsagar request to government).
Jayadutt Kshirsagar: शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडू नये, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शासनाकडे विंनती - जयदत्त क्षीरसागर
बीड जिल्ह्यांत परतीच्या पावसाने खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तुर्तास शेतकऱ्यांचा शेतीवरील वीजपुरवठा तोडू नये, अशी विंनती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jayadutt Kshirsagar) केली आहे. (Jayadutt Kshirsagar request to government).
जिल्ह्यांत परतीच्या पावसाने नुकसान -बीड जिल्ह्यांत परतीच्या पावसाने खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता शेती पिकांना विहिरीतून पाणी देणे नितांत आवश्यक असल्यामुळे शेतकऱ्यानी ईलेक्ट्रीकल मोटारी चालू ठेवल्या आहेत. परंतु या महिन्यात बीड जिल्ह्यांत थकीत वीजबीलामुळे एमएसईबी घावुक पध्दतीने वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे उरली सुरली पीके पाण्याअभावी जळून जातील. त्यामुळे तुर्तास शेतकऱ्यांचा शेतीवरील वीजपुरवठा तोडू नये, अशी विंनती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर केली आहे.