बीड - जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी पाठवलेल्या 41 स्वॅबपैकी 5 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून, 36 निगेटिव्ह आले आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सापडलेल्या रुग्णांमध्ये कारेगाव (ता.पाटोदा) येथे आढळलेल्या रुग्णासोबत प्रवास केलेले तिघे असून, एक जण पाटोदा शहरातील तर एक जण मुंबईहून प्रवास करून आलेला आहे. याशिवाय धारुर तालुक्यातील एक कोरोनाग्रस्त औरंगाबादहून प्रवास करून आलेला आहे.
बीडमध्ये 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण 51 रुग्णांवर उपचार सुरू - beed covid 19 hospital
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी पाठवलेल्या 41 स्वॅबपैकी 5 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून, 36 निगेटिव्ह आले आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बीडमध्ये 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण 51 रुग्णांवर उपचार सुरू
बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी यात पाच रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 51 इतकी आहे. आत्तापर्यंत तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला तर सहा रुग्ण पुणे येथे उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची तालुकानिहाय संख्या बीड 12, माजलगाव 10, धारुर 8, पाटोदा 9, वडवणी 4, केज 2, परळी 2, शिरुर 2, गेवराई 1 आणि आष्टी 1 अशी आहे.