बीड- जिल्ह्यातील आष्टी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती 23 मार्चदरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी येथे काही दिवस वास्तव्यास राहिल्यानंतर तो अचानक आजारी पडला. यानंतर रुग्णाला उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याात आले.
कोरोनाचा बीडमध्ये शिरकाव; आष्टी येथे आढळला पहिला रुग्ण - बीडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण
जिल्ह्यातील आष्टी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती 23 मार्चदरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी येथे काही दिवस वास्तव्यास राहिल्यानंतर तो अचानक आजारी पडला.
संबंधित व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्हा आरोग्य विभागाने त्या व्यक्तीच्या सर्व कुटुंबीयांना बीड जिल्हा रुग्णालयातील विलगीलगीकरण कक्षात ठेवले आहे. पुढील उपचार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील दोघेजण हे नगर येथे जमातीसाठी गेले होते. त्या दोघांनी 23 मार्चपासून नगरमध्ये एका मस्जिदमध्ये मुक्काम केला. चार दिवसांपूर्वी हे दोघे बीड जिल्ह्यात दाखल झाले. आरोग्य प्रशासनाने नगर येथूनच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. अखेर त्यातील एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अन्य एकाच अहवाल प्रतिक्षेत आहे, दरम्यान या दोघांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना बीडच्या जिल्हा रुग्णलयात दाखल केले गेले आहे.