बीड -लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका जवानावर अॅट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधीत आरोपीचे १० जूनला लग्न होणार होते. मात्र, त्याला लग्नाच्या एक दिवसापूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकावे लागले.
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जवानावर गुन्हा दाखल - शिवाजीनगर पोलीस
आरोपीचे १० जूनला लग्न होणार होते. मात्र, त्याला लग्नाच्या एक दिवसापूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकावे लागले.
जिल्ह्यातील वडवणी येथील आरोपी प्रदीप राजाभाई मुंडे सैन्यदलात कार्यरत आहे. वडवणी येथेच त्या पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या घराच्या मागे या आरोपीचे घर आहे. गेल्या २ वर्षांपूर्वी जवान सुट्टींवर आल्यानंतर त्या दोघांची भेट झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याने गेल्या २ वर्षांपासून त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते.
गेल्या २८ एप्रिलला आरोपी बीडला त्या तरुणीच्या घरी आला होता. त्याने तिच्या घरी मुक्कामदेखील केला. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान मे महिन्यात आरोपीचे एका मुलीबरोबर लग्न जमले आणि साखपुडाही झाला. त्यानंतर आता १० जूनला त्याचे लग्न होते. ही माहिती पीडितेला समजल्यानंतर तिला धक्का बसला. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.