महाराष्ट्र

maharashtra

गर्दी टाळली नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम, तज्ज्ञांचा इशारा

By

Published : Jun 27, 2021, 8:01 PM IST

बाजारात होत असलेली गर्दी व शासनाच्या नियमांची पायमल्ली चिंतेचा विषय बनला आहे. मास्क, सॅनिटायझर व 'दो गज की दुरी' या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली नाही तर तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले आहे.

third-wave-of-corona-persists-
third-wave-of-corona-persists-

बीड - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचे असेल तर प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात होत असलेली गर्दी व शासनाच्या नियमांची पायमल्ली चिंतेचा विषय बनला आहे. मास्क, सॅनिटायझर व 'दो गज की दुरी' या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली नाही तर तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 453 हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. सद्यस्थितीत सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सर्व अस्थापना सुरू असतात. या दरम्यान बीड शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चिंतेची बाब म्हणजे बहुतांश वेळा नागरिक शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करत नसल्याची बाब समोर आलेली आहे. या संबंधाने बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी देखील एक लेखी पत्रक काढून नागरिकांना शासनाच्या कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचे पालन करण्या संदर्भात आवाहन केले होते. इतर देशांमध्ये तिसरी लाट येत असल्याने दिवसेंदिवस चिंतेत भर पडत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम
तिसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. शासनाच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साबळे यांनी केले आहे. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही ते म्हणाले. बीड शहरातील सुभाष रोड, जालना रोड, नगर रोड तसेच माळीवेस भागातील बाजारपेठांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
..या उपाययोजनांवर द्यावा लागेल भर -
भविष्यात येणारी तिसरी लाट रोखायची असेल तर जलदगतीने लसीकरण, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे व शासनाच्या त्रिसूत्रीचा वापर करण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक आहे. अन्यथा तिसऱ्या लाटेचा धोका होऊ शकतो, असेच तज्ज्ञांचे देखील म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details