महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध गुन्ह्यांच्या तपासात मोलाची साथ देणाऱ्या 'डॉन'चे निधन

दहा वर्षात 436 गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोलाची साथ दिलेल्या पोलीस दलातील श्वान 'डॉन' ने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. नोव्हेंबर 2020 मध्ये तो श्वान पथकातून निवृत्त झाला होता. आठ दिवसांपासून वृध्दापकाळाने त्याची प्रकृती ढासळली होती.

don-who-played-important-role-in-various-crime-investigation-take-a-last-breath-in-beed
विविध गुन्ह्यांच्या तपासात मोलाची साथ देणाऱ्या 'डॉन'चे निधन

By

Published : Feb 7, 2021, 6:42 PM IST

बीड - मागील दहा वर्षात 436 गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोलाची साथ दिलेल्या पोलीस दलातील श्वान 'डॉन' ने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. डॉन दोन महिन्यांपूर्वीच निवृत्त झाला होता. यावेळी हँडलरसह सहकाऱ्यांना गलबलून आले होते.

पथकातील सर्वांत ज्येष्ठ सैनिक -

जिल्हा पोलीस दलात 2010 मध्ये श्वान पथकाची निर्मिती करण्यात आली. तेव्हा सुरुवातीला दोनच श्वान बीड या पथकात होते. यापैकीच एक डॉन, तर दुसरा मार्शल होता. मार्शलचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. डॉन हा जर्मन शेफर्ड प्रजातीचा असून या पथकातील सर्वांत ज्येष्ठ सैनिक होता. ग्राऊंड स्मेल स्पेशालिस्ट सैनिक म्हणून त्याने ख्याती मिळवली होती. अखेरच्या श्वासापर्यंत या मुक्या सैनिकाने निष्ठेने कर्तव्य बजावले. नोव्हेंबर 2020 मध्ये तो श्वान पथकातून निवृत्त झाला होता. आठ दिवसांपासून वृध्दापकाळाने त्याची प्रकृती ढासळली होती. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.

अशी होती डॉनची करकिर्द -

पिंपळनेर व परळी शहर ठाणे हद्दीतील खून प्रकरणात डॉनने थेट आरोपींवर झडप घातली होती. अंबाजोगाई ग्रामीण हद्दीतील मारामारीच्या एका प्रकरणातही त्याने पोलिसांना आरोपी मिळवून दिले होते. राजापूर (ता. ग़ेवराई) येथील दरोड्याच्या तपासातही त्याचा 'क्ल्यू' महत्त्वाचा ठरला होता. यासोबतच अंबाजोगाईतील योगेश्वरी देवी मंदिरातील दागिने चोरी प्रकरणात चांदीच्या कमानीचा तुटलेला तुकडा त्याने पोलिसांना मिळवून दिला होता.

सहा सुवर्ण, एक कांस्यपदक -

ग्राऊंड स्मेल स्पेशालिस्ट असलेल्या डॉनने कर्तव्य मेळाव्यात बीड पोलिसांना सहा सुवर्ण व एक कांस्यपदक मिळवून दिले होते. 2013 मध्ये भोपाळ येथील राष्ट्रीय कर्तव्य मेळाव्यात त्याने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर 2015 मध्ये हरियाणात त्याने चौथा, तर चेन्नईत पाचवा क्रमांक मिळविला होता. तीन परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्यात सुवर्णपदक मिळवणाऱ्या डॉनने राज्य कर्तव्य मेळाव्यातही यशाची परंपरा कायम ठेवली होती. तसेच 2013, 2014 व 2018 मध्येही त्याने सुवर्ण पदकांची कमाई केली होती.

हेही वाचा - चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून बनवले अश्लील व्हिडिओ, 5 जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details