बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा येथे धुलिवंदनाच्या निमित्ताने जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्याची ८४ वर्षापासूनची परंपरा आहे. या परंपरेनुसार गुरुवारी विडेकरांनी जावयाची गाढवावर बसून वाजत-गाजत मिरवणूक काढली. रंग उधळत काढलेल्या या मिरवणुकीत सर्व गाव सहभागी झाला होता. यावर्षी गदर्भ सवारीचे मानकरी बंडू पवार हे जावई ठरले.
सालाबादप्रमाणे यावर्षी गदर्भ सवारीचे मानकरी ठरलेले जावई बंडू पवार यांची गावातून मिरवणूक काढली. ८५ वर्ष परंपरा असलेला या अनोख्या उपक्रमाबाबत सांगताना येथील ग्रामस्थ व पत्रकार दत्ता देशमुख म्हणाले की, बीड येथील आनंदराव देशमुख यांच्या जावयाला सर्वात पहिल्यांदा धुलिवंदनच्या निमित्ताने गदर्भ सवारी घडवून आणली होती. बीड येथील रहिवाशी सावळाराम पवार यांचे जावई बंडू पवार (रा. शिंधी ता. केज) यांची ग्रामस्थांनी गदर्भ सवारी काढून नंतर त्यांना उभा पोशाख तसेच सोन्याच्या अंगठी देऊन सन्मान केला.