बीड -राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज(शुक्रवार) महाशिवरात्रीनिमित्त परळी येथे प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच महोत्सवानिमित्त परळीत आलेल्या भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी वैद्यनाथ मंदिर कमिटीच्या वतीने ना. मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त धनंजय मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन वैद्यनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी परळी नगर परिषदच्या वतीने मोफत फराळ व खिचडी वाटप आयोजित करण्यात आले होते. या फराळ वाटपात ना. मुंडे यांनी सहभागी होऊन फळे व खिचडी वाटप केली. त्याचबरोबर परिसरात यात्रेनिमित्त उभारलेल्या विविध स्टॉल्सला भेटी दिल्या.
सोमेश्वर संस्थान पालखी -
दरम्यान परळी शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथील 'सोमेश्वर संस्थानच्या पालखी सोहळ्या'सही मुंडे यांनी उपस्थिती लावली. ही पालखी जिरेवाडी येथून वाजत गाजत वैद्यनाथ मंदिरापर्यंत जाते, अशी परंपरा आहे.
हेही वाचा -बीड-परळीत हजारो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन
दरवर्षीप्रमाणे ना. मुंडेंनी या पालखी सोहळ्यात सहभागी होत पालखीला खांदाही दिला. यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड. गोविंद फड, जि.प. सदस्य डॉ. मधुकर आघाव, अजय मुंडे, दत्ता आबा पाटील, बाजीराव धर्माधिकारी यांसह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -धक्कादायक! भाजीत मीठ न टाकल्याने पत्नीची हत्या, पती फरार