महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

2014 च्या जाहीरनाम्यातील एकही काम पंकजा मुंडेंनी केले नाही; धनंजय मुंडेंची बहिणीवर टीका

आजच्या सभेत धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या 2014 च्या निवडणुकीतील जाहीरनाम्याचे वाचन केले. यात वचन दिलेले टेक्सस्टाईल हब झाले का? पंचतारांकित एमआयडीसीचे काय? कुठे आहे मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल? आणि कुठे आहे प्रदुषणमुक्त परळी? असे जाहीरनाम्यातील दिलेले एक-एक वचन वाचून दाखवत जाहीरनाम्याची पोलखोल केली. कदाचित भाजपचा विकास हा गुप्त असतो, त्यामुळे तो परळीकरांना दिसत नसावा, असा चिमटाही त्यांनी काढला.

धनंजय मुंडे

By

Published : Oct 3, 2019, 11:16 PM IST

Updated : Oct 3, 2019, 11:30 PM IST

बीड - कोट्यवधी रुपये आणल्याच्या थापा मारणार्‍या पंकजा मुंडे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याच्या वचनातील एकही काम केले नाही, याची विराट जाहीर सभेत पोलखोल करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या जनतेसमोर पंकजा यांच्या अपयशाचा पुरावाच सादर केला. सत्तेत आल्यावर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. तर, 10 वर्षे बहिणीला सांभाळले आता माझ्या दादाला सांभाळा, अशी भावनिक साद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी घातली.

धनंजय मुंडेंचा उमेदवारी अर्ज भरतानाचे ड्रोन व्हिडिओ

हेही वाचा -पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा

परळी विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यानंतर निघालेल्या रॅलीच्या समारोपावेळी मोंढा मैदानावर झालेल्या सभेत हे सर्वजण बोलत होते.

2014 च्या संकल्पाचे काय झाले?- धनंजय मुंडे

आजच्या सभेत धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या 2014 च्या निवडणुकीतील जाहीरनाम्याचे वाचन केले. यात वचन दिलेले टेक्सस्टाईल हब झाले का? पंचतारांकीत एमआयडीसीचे काय? कुठे आहे मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल? आणि कुठे आहे प्रदुषणमुक्त परळी? असे जाहीरनाम्यातील दिलेले एक-एक वचन वाचून दाखवत जाहीरनाम्याची पोलखोल केली. कदाचित भाजपचा विकास हा गुप्त असतो, त्यामुळे तो परळीकरांना दिसत नसावा, असा चिमटाही त्यांनी काढला.

हेही वाचा - काँग्रेसच्या 19 उमेदवारांची चौथी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुख रिंगणात

परळीच्या वाघाला साथ द्या- अमोल मिटकरी

'आजचा क्षण डोळे टिपावणारा आहे. भाजपने भावनिक करून मते मागितली, पण सामान्य माणसाला काय मिळाले? असा प्रश्न करत दिवंगत गोपीनाथ मुंडेंची छबी असलेल्या धनंजय मुंडेंना आशीर्वाद द्या, 10 वर्ष बहिणीला सांभाळले आता माझ्या दादाला सांभाळा,' असे आवाहन प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केले.

सुरेश धस वैफल्यग्रस्त- बजरंग सोनवणे

भाजपला उमेदवार मिळत नाहीत, म्हणूनच केजच्या माणसाला माजलगाव आणि केजमध्ये राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागली, असा टोला सोनवणे यांनी लगावला. 'आष्टीचे आमदार सुरेश धस त्यांच्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातूनच ते परळीत येवून धनंजय मुंडेंवर नाटकी टीका करत आहेत. परळीची स्वाभिमानी जनता आपल्या लाडक्या सुपुत्रावरील ही टीका कदापिही सहन न करता मतपेटीतून चोख उत्तर देईल,' असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.

Last Updated : Oct 3, 2019, 11:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details