बीड - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच आज भगवानबाबा गडावर आले होते. यावेळी त्यांनी समाधीचे दर्शन घेऊन, गडाचे महतं नामदेवशास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. गडावर मी पाईक म्हणून गेलो होतो. गडाची, मठाची सेवा करणे आमची जबाबदारी असून, इथून पुढे गडाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली.
'इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, गडाच्या विकासासाठी सदैव तत्पर'
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच आज भगवानबाबा गडावर आले होते. यावेळी त्यांनी समाधीचे दर्शन घेऊन, गडाचे महतं नामदेवशास्त्री यांचे आशिर्वाद घेतले.
आज भगवानबाबा गडावर धनंजय मुंडेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गडावर यावेळी धनंजय मुंडेंच्या नावाने जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा गड भगवानबाबांनी निर्माण केला आहे. इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, भगवानबाबापेक्षा कोणीही मोठे नाही. हीच माझी श्रद्धा असल्याचे मुंडे म्हणाले.
राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल तेव्हा भगवानगडावर येऊन बाबांचे दर्शन घ्यावे, अशी आज्ञा गडाचे मठाधिपती नामदेवशास्त्रींनी केली होती. त्यानुसार महाराजांची आज्ञा पाळत आज भगवानगडावर जाऊन बाबांचे दर्शन घेतल्याचे मुंडे म्हणाले.