बीड -दीड महिना दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हजेरी लावली. पण, या पावसाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही. सोयाबीन,तूर,कापूस,उडीद, मूग या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. दरम्यान, हाच पाऊस आठवडाभरापूर्वी पडला असता, तर कदाचित नुकसान टळले असते. आता पाऊस आला पण हातातली पिके गेली, अशी भावना जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
पाऊस आला पण...! बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा
दीड महिना दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हजेरी लावली. पण, या पावसाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही. सोयाबीन,तूर,कापूस,उडीद, मूग या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. दरम्यान, हाच पाऊस आठवडाभरापूर्वी पडला असता, तर कदाचित नुकसान टळले असते. आता पाऊस आला पण हातातली पिके गेली, अशी भावना जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपली
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, दीड महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपली.
यंदाही जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.