आष्टी(बीड) - देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. या महामारीला संपवण्यासाठी लसीकडे वैद्यकीय शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. मात्र, लसीकरणानंतर शरीरावर काही परिणाम होईल का या भीतीमुळे अनेक ठिकाणी लसीकरणाकडे कर्मचा-यांनी पाठ फिरवली आहे. माञ, आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी (28 जानेवारी) 233 कर्मचाऱयांनी लस घेतली आहे. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी स्वत; भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
आष्टीत एकाच दिवशी 233 कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस - ashti corona news
आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी (28 जानेवारी) 233 कर्मचाऱयांनी लस घेतली आहे. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी स्वत; भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
शासकीय कर्मचारी यांच्यासह प्रायव्हेट रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांना दररोज 100 जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु, सुरूवातीला लसीकरणादरम्यान आरोग्य विभागातील कर्मचाऱयांची लस घेण्याची मानसिकता नसल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहूल टेकाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोरे यांनी याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना महत्व पटवून देऊन लसीकरणाचे डोस वाढवले. 28 जानेवारी रोजी एकाच दिवशी जवळपास 233 कर्मचाऱयांनी लस घेतली आहे.
या दरम्यान, लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनीही दुपारी दोन वाजता आष्टी ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट दिली. तसेच येथील रुग्णालयातील कोरोनाकाळात कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टर असूनही किर्तन सेवा देणाऱया डॉ.अमित डोके यांचे विशेष कौतूक केले. तसेच एड्स विभाग, आयुष विभाग, सोनोग्राफी विभागाचीही पाहणी करून संपूर्ण रूग्णालयातील सेवा व व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मोराळे, डॉ.किशोर भोसले, डॉ.संतोष जावळे, प्रयोगशाळा वैद्यानिक जयचंद नेलवाडे, सुजाता दहिफळे यांच्यासह आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.