बीड- 'दुबई रिटर्न' महिलेला कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. बीडमध्ये कोरोनाग्रस्त महिला संशयित असल्याचे कळताच एकच खळबळ उडाली होती. सध्या या महिलेचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
दुबईहून परतलेल्या कोरोना संशयित महिलेला बीड जिल्हा रुग्णालयात केले दाखल - कोरोना संशयित रुग्ण बीड
६५ वर्षीय वृद्ध महिला १७ मार्चला दुबईहून भारतात परत आली. पुणे येथील विमानतळावर उतरून त्या बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. गुरुवारी सकाळी त्यांना ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या मुलाने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. खासगी डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
संबंधित ६५ वर्षीय वृद्ध महिला १७ मार्चला दुबईहून भारतात परत आली. पुणे येथील विमानतळावर उतरून त्या बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. गुरुवारी सकाळी त्यांना ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या मुलाने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. खासगी डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वृद्धेच्या मुलाने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला. तिला गुरुवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी १६ खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापन केला असून तेथे त्यांची आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सेवा सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.