महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आष्टीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात - आष्टीत कोरोना लसीकरण सुरुवात

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी 11 वाजता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे.

corona
corona

By

Published : Jan 16, 2021, 5:27 PM IST

आष्टी(बीड) - आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी 11 वाजता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात 100 आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार असल्याचे डॉ. राहूल टेकाडे यांनी सांगितले.

आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, तहसिलदार शारदा दळवी, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहूल टेकाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मोराळे, डॉ. संतोष जावळे उपस्थित होते. यावेळी आरोग्य कर्मचारी सुनिल खताळ यांना लस देऊन मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

सर्वसामान्यांना लस कधी

लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिली लस ही कोरोना योद्ध्यांना दिली जाणार आहे. मात्र ती सर्व सामान्यांना कधी दिली जाणार या बाबत संभ्रम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र पुढील काही महिन्यात ती सर्वसामान्यांना दिली जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अजून दोन तीन कंपन्या कोरोना लस पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची लस शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लसीचा मोठा साठा उपलब्ध होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details