आष्टी(बीड) - नगर पंचायतची नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या प्रारूप मतदार यादीत नावांचा घोळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या मतदारांची नावे या प्रभागातून दुसऱया प्रभागात गेल्याने इच्छूक उमेदवारांची पळापळ झाली. तर, अधिकाऱयांना याबाबतची ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.
आष्टी नगर पंचायतच्या निवडणुकीची तयारी निवडणूक प्रशासनाकडून सुरू झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी आष्टी नगर पंचायतच्या प्रभाग निहाय 1 ते 17 प्रभागाच्या प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्या आहेत. पतीचे नाव एका प्रभागात तर पत्नीचे नाव दुसऱयाच प्रभागात गेले आहे. तसेच इच्छूक उमेवारांच्या जवळचेच मतदार दुसऱया प्रभागात गेल्याने सर्वच इच्छूक उमेदवारांची आपले मतदार परत आपल्या प्रभागात आणण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे. याबाबत नगर पंचायत अधिकाऱयांना कसलाच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.
प्रारूप मतदार यादीत प्रभागनिहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र- 1 स्त्री-258 पुरूष-277 एकूण-535
प्रभाग क्र- 2 स्त्री-337 पुरूष-334 एकूण-671
प्रभाग क्र- 3 स्त्री-177 पुरूष-173 एकूण-350
प्रभाग क्र- 4 स्त्री-397 पुरूष-408 एकूण-805
प्रभाग क्र-5 स्त्री-257 पुरूष-280 एकूण-537
प्रभाग क्र-6 स्त्री-276 पुरूष-297 एकूण-573
प्रभाग क्र-7 स्त्री-161 पुरूष-198 एकूण-359