महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांकडून टँकरची तपासणी; टँकर माफियांना दिली तंबी - adminstarative

बीड जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळ आहे, अशा परिस्थितीत जनतेला पाणी पुरविण्याचे मोठे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे. आज साडेचारशेच्या जवळपास टँकर सुरू आहेत.

जिल्हाधिकारी

By

Published : Mar 9, 2019, 11:41 AM IST

बीड-जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. साडेचारशेच्या जवळपास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत कमी खेपा टाकून जास्त दाखवल्या जातात. याबाबतच्या तक्रारी बीडच्या जिल्हाधिकाऱयांकडे आल्या होत्या. त्यावरून शुक्रवारी खुद्द जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी गेवराई येथे टँकरची तपासणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या अचानक तपासणीमुळे टँकर माफियांचे धाबे दणाणले आहेत.


बीड जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळ आहे, अशा परिस्थितीत जनतेला पाणी पुरविण्याचे मोठे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे. आज साडेचारशेच्या जवळपास टँकर सुरू आहेत. गत आठवड्यात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खेपा कमी टाकून जास्त दाखवल्या जात असल्याच्या तक्रारीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. यामुळे नागरिकांना पाणी कमी मिळते. या सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पांडे यांनी गेवराई तालुक्यात टँकरची अचानक तपासणी केली. किती किलोमीटरवर आहे, किती खेपा टाकल्या जातात, याची सर्व माहिती घेत तपासणी केली. जीपीआरएस सुविधा टँकर चालक मालक वापरतात का? शासनाने अटी व शर्ती घालून दिले आहेत त्याची अंमलबजावणी होते का? याची पाहणी केली व नियमाला धरून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी टँकर चालकांना दिल्या.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details