महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये वाळू माफियावर जिल्हाधिकाऱ्यांनी उगारला कारवाईचा बडगा; २ हजार ब्रास ताब्यात

बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेंनी आज गेवराई येथील वाळू पट्ट्यात जाऊन वाळू टिप्पर ताब्यात घेऊन कारवाई केली.

By

Published : Apr 24, 2019, 11:36 PM IST

जिल्हाधिकारी अस्तिक पांडे

बीड - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी आज गेवराई तालुक्यातील वाळू पट्ट्यात जाऊन वाळू टिप्पर ताब्यात घेऊन कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत जिल्हाधिकारी यांनी २ हजार ब्रास वाळू ताब्यात घेतली आहे.

जिल्हाधिकारी अस्तिक पांडे

बीडमध्ये १६ ते १७ वाळू पट्टे आहेत. यामध्ये ३ ते ४ वाळू पट्टे वगळता इतर वाळू पट्ट्यांचा अद्यापपर्यंत लिलाव झालेला नाही. मात्र, तरी देखील वाळू माफिया सर्रासपणे वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे याच्या तक्रारी बीडचे जिल्हाधिकारी पांडे यांच्याकडे आल्यानंतर बुधवारी त्यांनी स्वतः गेवराई तालुक्यातील राजापूर पट्ट्यात जाऊन टिप्पर मध्ये वाळू भरताना रंगेहात वाहने पकडली. यामुळे वाळूमाफियांचा मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱयांनी अचानक वाळू पट्ट्याला भेट दिल्यामुळे १५ ते १६ टिप्पर अवैध मार्गाने वाळू वाहतूक करताना आढळून आले. एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे राजापूर येथील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची मिलीभगत समोर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details