बीड - बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे, असा आक्षेप काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी घेतला होता. यावरून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघ : काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल - marhan
याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
अर्जावर आक्षेप घेतला म्हणून मला भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या सांगण्यावरून मारहाण केली असल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दादासाहेब यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय शासकीय कामकाजात अडथळा केल्याबाबत पोलिसांनीदेखील आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.