महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा समाजाच्या हिताचा आघाडी सरकारने खून केला - आशिष शेलार - आशिष शेलार बीड न्यूज

मराठा आरक्षणावरून भाजपा नेते आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'आघाडी सरकारने जाणीवपूर्वक मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे', असे शेलारांनी म्हटले आहे.

beed
बीड

By

Published : Jun 2, 2021, 7:16 PM IST

बीड - 'मराठा समाजाला आरक्षण द्या, असे आज गळे काढणारे तेव्हा मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध करत होते. या आघाडी सरकारने जाणीवपूर्वक मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. एवढेच नाही तर मराठा समाजाच्या हिताचा या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने खून केला आहे', असे वक्तव्य भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे. ते बीड येथे आज (2 जून) पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजाच्या हिताचा आघाडी सरकारने खून केला- आशिष शेलार

'आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक'

'मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आतापर्यंत आयोग नेमले. मात्र, नियोजनबद्ध पद्धतीने जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण नाकारले गेले. याच आघाडी सरकारने संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. मात्र, जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील. आमची मागणी हिच आहे की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा. याशिवाय राज्य सरकारने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी 3 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज तत्काळ द्यावे', अशी मागणी आशिष शेलारांनी केली.

'भावनाशून्य व कर्तव्यशून्य असलेला पक्ष शिवसेना'

आशिष शेलारांनी यावेळी शिवसेनेला टोला लगावला. 'शिवसेनेने जर गायकवाड आयोगाची बाजू खंबीरपणे मांडली असती, तर आजचे चित्र वेगळे राहिले असते. मात्र, तसे शिवसेनेने केलेले नाही. त्यांच्या या कृतीवरून भावनाशून्य व कर्तव्यशून्य असलेला पक्ष शिवसेना आहे असे दिसते', असे शेलारांनी म्हटले.

हेही वाचा -'सत्ता येणार, असे सांगून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न'

ABOUT THE AUTHOR

...view details