महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमधील वाण धरण चार वर्षांनंतर 'ओव्हरफ्लो'!

मुसळधार पावसामुळे परळी तालुक्यातील वाण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडाव्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे आता परळीकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

वाण धरण
वाण धरण

By

Published : Sep 23, 2020, 2:56 PM IST

बीड - जिल्ह्यातील परळी तालुक्यात असलेले नागापूर येथील वाण धरण मंगळवारी रात्री ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र बुधवारी सकाळी पहायला मिळाले. तब्बल चार वर्षांनंतर वाण धरण भरले असल्याने परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मागील आठवडाभरापासून बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. बहुतांश भागात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. तथापि, परळी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. परळी शहरासह आसपासच्या पंधरा गावांना वाण धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी वाण धरण ओव्हर फ्लो झाल्याने परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अशी आहे वाण धरणाची साठवण क्षमता

परळी तालुक्यातील नागापूर शिवारातील वाण प्रकल्पाची 19.7071 द.ल.घ. मी एवढी साठवण क्षमता आहे. सन 2016नंतर हे धरण बुधवारी पहाटे ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे परळी शहरासह पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. एकंदरीत वाण धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी, परळी नगरपालिकेच्या नियोजनाअभावी चार ते सहा दिवसाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने परळीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details