महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी स्वतःला कुटुंबीयांपासून केले आयसोलेट - बीड शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या हजाराच्यावर पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सर्वांना खबरादारी करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विशेष खबरादरी बाळगण्याची गरज आहे. अशाच डॉक्टरांबाबत लाईफस्टाईलबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा...

corona update  corona maharashtra  कोरोना अपडेट  बीड शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात  डॉ. अशोक थोरात
बीडचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी स्वतःला कुटुंबीयांपासून केले आयसोलेट

By

Published : Mar 30, 2020, 7:59 AM IST

बीड - जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयातील कोरोना विषाणूंच्या संशयित रुग्णांची वेळोवेळी तपासणी करणारे तसेच त्यांच्यावर उपचार करणारे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी १२ दिवसापासून स्वतःला आयसोलेट केले आहे. आपल्यापासून कुटुंबीयांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत डेंजर झोनमध्ये काम करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील शल्यचिकित्सककांच्या लाईफस्टाईलबाबत 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा...

बीडचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी स्वतःला कुटुंबीयांपासून केले आयसोलेट
बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी मागील १२ दिवसातील आपल्या लाइफस्टाईलबाबत सांगताना म्हटले की, मी घरी वावरत असताना आपल्यापासून कुटुंबीयांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतो. दिवसभर सतत जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी असेल किंवा दररोज सकाळी वार्डनिहाय राऊंड असेल, या सगळ्या बाबी करत असताना कोरोना विषाणूचा धोका निर्माण होऊ शकतो. याची आम्हाला पुरेपूर कल्पना आहे. यामुळे आम्ही घरी वावरताना स्वतःला कुटुंबापासून वेगळे केले आहे. मागील १५ दिवसात मी कंबरेचा बेल्ट, खिशातील मनी पॉकेट व घरात वापरलेला पेन ऑफिसमध्ये घेऊन जात नाही. तसेच ऑफिसमध्ये वापरत असलेले पेन देखील घरी घेऊन येत नाही. एकंदरीत ही काळजी आम्हाला डॉक्टर म्हणून घ्यावी लागत आहे.
घरात प्रवेश करताना मुख्य दारातून न करता पाठीमागच्या दारातूनच वावरतो. कारण, ज्या दारातून कुटुंबातील सर्व सदस्य व इतर लोक वावरतात तेथून देखील मी जात नाही. ही काळजी मीच नाही तर आरोग्य क्षेत्रात माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी देखील घेत आहेत. डॉक्टर म्हणून आम्हाला ती काळजी घ्यावी लागते. हे सांगत असताना मी नागरिकांना आव्हान करू इच्छितो की, नागरिकांनी केवळ घरात बसून राहिले तरी ती आमच्यासाठी खूप मोठी मदत असेल, असेही यावेळी डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details