बीड- या देशाचे नागरिक म्हणून आम्ही पहिल्यांदाच मतदान करत आहोत. देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष भावनेने आम्ही मतदानाला सामोरे जाणार आहोत. कारण या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा महत्वाचा व मोठा उत्सव आहे. अशा प्रतिक्रिया बीड येथील बलभीम महाविद्यालयातील नवमतदार विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.
बीडची तरुणाई म्हणते.. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला सामोरे जाणार
बीडच्या तरुणाईला काय वाटतंय राजकारणाबाबत?
हेही वाचा - या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !
यावेळी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधताना तरुणांनी म्हटले आहे की, कुठल्याही जाती पातीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्ही मतदान करताना उमेदवाराचे चारित्र्य व यापूर्वी केलेली कामे पाहूनच मतदान करणार आहोत. काही विद्यार्थी म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता निर्माण करणारा लोकप्रतिनिधी आम्हाला निवडून द्यायचा आहे. यामध्ये काही विद्यार्थिनींनी मत मांडताना सांगितले की, आतापर्यंत बरीच कामे झालेली आहेत. मात्र, काही कामे ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत अद्यापपर्यंत पोहोचलेले नाहीत. जो सामान्यांचे प्रश्न मांडेल अशाच लोकप्रतिनिधींच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे मत बीड येथील बलभीम महाविद्यालयातील तरुण व नवमतदारांनी व्यक्त केले.