बीड- हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार राज्यातच नव्हे तर, संपूर्ण देशातील शेतकरी पिकांचे नियोजन करत असतात. मात्र, हवामान विभागाचा सातत्याने अंदाज चुकत आहे. त्यामुळे यंदा जर हवामान विभागाचा अंदाज चुकला तर, विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा जिल्ह्यातील माजलगाव येथील शेतकरी तसेच शेतकरी संघटनेचे नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी शनिवारी दिला आहे.
'पावसाचा अंदाज चुकला, तर हवामान विभागाच्या कार्यालयालाच टाळे ठोकू' - पाऊस
या सर्व प्रकाराबाबत यापूर्वीच जिल्हा प्रशासनालादेखील निवेदन देऊन हवामान विभागाच्या फसव्या अंदाजाबाबत सांगितलेले आहे.
या सर्व प्रकाराबाबत यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला देखील निवेदन देऊन हवामान विभागाच्या फसव्या अंदाजाबाबत सांगितलेले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून हवामान विभाग सांगत असलेला अंदाज चुकत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हवामान विभागाने चांगला पाऊस आहे, असे जाहीर केल्यावर शेतकरी बी-बियाणे खत घरात आणून ठेवतो. अनेकवेळा शेतकरी धूळ पेरणी करतो. मात्र, नंतर हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पाऊस पडत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढावले जाते. हे सगळे दृष्टचक्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. आमच्या मते जर हवामान विभागाने खोटे अंदाज सांगितले नाही. तर, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. किमान बी-बियाणांची तरी पैसे वाचतील असा युक्तिवाद बीड येथील शेतकरी संघटनेचे नेते गंगाभिषण थावरे यांनी केला आहे.