महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण; बीड जिल्हयातील 111 ग्रामपंचायतींचा उद्या निकाल - बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक

बीड जिल्ह्यातील एकूण 111 ग्रामपंचायतींची मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. ज्या-त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी केली असून एकूण सहा टेबलवरून मतमोजणी होणार आहे

gram panchayats election vote counting
gram panchayats election vote counting

By

Published : Jan 17, 2021, 6:54 PM IST

बीड - बीड जिल्ह्यातील एकूण 111 ग्रामपंचायतींची मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे. ज्या-त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी केली असून एकूण सहा टेबलवरून मतमोजणी होणार आहे. 18 जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींमधील एकूण 842 उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे.

आष्टी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून, 18 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तहसिल कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया सहा टेबलावरुन करण्यात येणार आहे.

आष्टी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यातील शेरी ब्रु. ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता या ग्रामपंचायतीची मतमोजणी सहा टेबलवर होणार असून यासाठी आठ पथके तयार केले आहेत. प्रत्येक पथकात चार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या मतमोजणीसाठी एकूण 32 अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच पहिल्या तीन फेरीत पिंपळा, हातोला, खुंटेफळ पुंडी, धनगरवाडी डो, कऱ्हेवाडी, वटणवाडी तर दुसऱ्या तीन फेरीत धनगरवाडी पिं, सुंबेवाडी, सोलापूरवाडी, डोईठाण कऱ्हेवडगाव असे एकूण सहा फेरीत अकरा ग्रामपंचायतचे निकाल दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे व नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details