महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने सुरू करू नका - जिल्हाधिकारी - बीड जिल्हाधिकारी

राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील.

बीड जिल्हाधिकारी
बीड जिल्हाधिकारी

By

Published : Apr 25, 2020, 2:39 PM IST

बीड- लॉक डाऊन काळात काही भागात व्यवसाय उद्योगांना शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही आस्थापना, दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे. राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन लाॅक डाऊनला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details