परळी - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदी पूर्वीचे उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आधी उपसभापती, आता सभापती पद देऊन धनंजय मुंडे यांनी न्याय दिला, अशी भावना यावेळी बालाजी मुंडे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयात पिंटू मुंडे यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी जि. प. गटनेते अजय मुंडे, न. प. गटनेते वाल्मिक कराड, कृ. उ. बा. स. संचालक सूर्यभान मुंडे, रा. काँ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, कृ. उ. बा. स. संचालक माऊली गडदे आदी उपस्थित होते.
परळी पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदी बालाजी मुंडे - dhananjay munde news
परळी पंचायत समितीच्या सभापती पदावर अविश्वास ठराव संमत झाल्याने हे पद रिक्त झाले होते. धनंजय मुंडे यांच्या हाती पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता असून, आज बालाजी मुंडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
Balaji Munde
अविश्वास ठराव संमत झाल्याने पद होते रिक्त
परळी पंचायत समितीच्या सभापती पदावर अविश्वास ठराव संमत झाल्याने हे पद रिक्त झाले होते. धनंजय मुंडे यांच्या हाती पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता असून, आज बालाजी मुंडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांनी धनंजय मुंडेंचे आभार मानले आहेत.
Last Updated : Jan 21, 2021, 5:43 PM IST