महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bail Granted to Dhananjay Munde : पूस साखर कारखाना जमीन गैव्यवहार प्रकरणात धनंजय मुंडे यांना जामीन मंजूर

पूस येथील साखर कारखाना जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 2018 मध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सदरील प्रकरण मागील पाच वर्षापासून न्यायप्रविष्ट होते. सतत गैरहरज असल्याने त्यांच्या विरोधात वॉरंट निघाले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर स्वतः हजर झाले होते. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर ( Bail Granted to Dhananjay Munde) केला आहे.

Bail Granted to Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांना जामीन मंजूर

By

Published : Apr 4, 2022, 4:49 PM IST

बीड - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील साखर कारखाना जमीन प्रकरणात पालकमंत्री धनंजय मुंडे हे सोमवारी (दि.४) अंबाजोगाई येथील न्यायालयात आले होते. पूस येथील साखर कारखाना जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 2018 मध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सदरील प्रकरण मागील पाच वर्षापासून न्यायप्रविष्ट होते. सतत गैरहरज असल्याने त्यांच्या विरोधात वॉरंट निघाले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर स्वतः हजर झाले होते. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर ( Bail Granted to Dhananjay Munde) केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या प्रकरणात २०१८ साली दाखल गुन्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्या. पाटील यांनी जामीन मंजूर केला. २०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वॉरंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालयासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला.

हेही वाचा -VIDEO : भरउन्हात पाण्यासाठी हरणांची भटकंती; ममदापूर वनक्षेत्रातील पाणवठे झाले कोरडेठाक

ABOUT THE AUTHOR

...view details