बीड : आरटीओ कार्यालयात कडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वापरणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दूध घेऊन जाणारे दुचाकी स्वार घसरून पडतात, यामुळे दूध वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याची माहिती नागरिक देत आहेत. त्याचबरोबर या रस्त्यावर तब्बल 15 ते 16 गावे असून या येथील नागरिकांना याच रस्त्याने ये- जा करावी लागत आहे, त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशीच मागणी नागरिकांनी केली आहे.
Beed : बीडच्या आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, रस्ता सुधारण्याची मागणी
बीडच्या आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याची माहिती नागरिक देत आहेत. त्याचबरोबर या रस्त्यावर तब्बल 15 ते 16 गावे असून या येथील नागरिकांना याच रस्त्याने ये- जा करावी लागत आहे, त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्ता दुरूस्त करण्याची मागणी - शेती या रस्त्यावर आहे आणि मला दररोज या रस्त्याने यावं लागत आहे परंतु घरचे लोक म्हणत आहेत की तुम्ही पडताल रस्ता लय खराब आहे म्हणून मला येऊ देत नाहीत, लहान मुलांना शेतात आणता येत नाहीत एवढे खड्डे झाले आहेत. टू व्हीलर वर येता येत नाही तर फोर व्हीलर अडकते. मागच्या वेळेस आमची फोर व्हीलर आणली होती ती अडकली एवढे खड्डे झाले आहेत, पुढे तर एवढे खड्डे आहेत की गाडी तिथेच लावावी व शेतामध्ये पायी जावो असं वाटतंय, एवढी अडचण आहे पावसाळ्यात तर येऊच शकत नाही, मी तीन महिने पावसाळ्यात आलोच नाही, घरच्यांनी सुद्धा येऊ दिलं नाही आणि मजूर महिला सुद्धा येत नाहीत सांगतात की तिकडे रस्ता नाही, एवढी भयानक अडचण आहे. शेत पडीक ठेवून द्यावं अस वाटतंय, असे तेथील स्थानिक लकीर पठाण सांगतात.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था - बीड तालुक्यात हा खड्डा खड्ड्याचा जो प्रकार आहे तो ग्रामीण भागातील लोकांना परवडण्यासारखा नाही. या रस्त्यावर नगर रोड मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावर आरटीओ कार्यालय पुनरोजीवीत होत आहे. तर ग्रामीण भागातील जनतेला या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या बैलगाड्या ट्रॅक्टर ऊस वाहतूक करणारे ट्रक मनात नुकसान होत आहे तर या भागात राहणाऱ्या महिला भगिनी गर्भवती महिला यांना जर रात्री अपरात्री अचानक रुग्णालयात नेण्याची वेळ आली तर अनेक लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून पासिंग साठी जे नवीन वाहने जात आहेत त्यांना सुद्धा अनेक अडचणी येत आहेत, नवीन वाहनाचे याच खड्ड्यामुळे जर पार्ट तुटले तर आरटीओ साहेब आपण कसे वाहन पासिंग करणार. या रस्त्याची दुर्दशा पाहून आम्हाला खूप वाईट वाटत आहे, मी एलआयसी एजंट आहे बिजनेस निमित्त मला सारखं बाहेर फिरावे लागत आहे मात्र या रस्त्याने वेळोवेळी जात येत असताना खड्ड्याचा त्रास होत आहे. आणि ग्रामीण भागातील लोकांना रस्त्यांची सुविधा निर्माण करून देण्याची मागणी सपकाळ यांनी केली.