महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा; 'त्या' वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण

भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आले आहे. धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध परळी पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून आपली बाजू मांडली आहे.

धनंजय मुंडे

By

Published : Oct 20, 2019, 3:18 AM IST

Updated : Oct 20, 2019, 4:35 PM IST

बीड - प्रचाराची वेळ संपता-संपता परळी विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी आक्षेपहार्य वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे वातावरण तापले असून पंकजा मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध परळी पोलिसांनी गुन्हा देखिल नोंदवला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून आपली बाजू मांडली आहे.

धनंजय मुंडे यांनी या पोस्ट मध्ये लिहले आहे, "शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे. मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित"

हेही वाचा -रोहितने केलेला विकास बघायला पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाहीत - शरद पवार

अपण जे बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर, मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंतीही त्यांनी केली आहे.

Last Updated : Oct 20, 2019, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details