महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 18, 2021, 7:21 PM IST

ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. त्याची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.

pooja
pooja

परळी (बीड) - गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत त्याला ताब्यात घेतले. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. त्याची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.

एकूण तीन पथकांकडून चौकशी

अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्याने संशय बळावला. पोलीस अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथके चौकशी करीत आहेत. याअगोदर पूजाच्या आई-वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details