बीड - नशिबी अठराविश्व दारिद्र्य असलेल्या जिल्ह्यातील माजलगाव येथील लंकाबाई राजेभाऊ खरात या महिलेच्या व्यथा अन वेदना हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. लंकाबाई चक्क सतराव्या वेळी गरोदर होत्या. त्यांच्या १६ बाळंतपणापैकी तीन मुलं आणि नऊ मुली वाचल्या तर 4 बाळं जन्मताच दगावली. त्यांना झालेले सतरावे बाळ पोटातच दगावले असून मुलगी होती.
...आणि तीचे सतरावे बाळ पोटातच दगावले; बीडच्या लंकाबाईची व्यथा माजलगाव येथील लंकाबाई या पालावर आयुष्य जगणाऱ्या महिलेला मरण यातना भोगाव्या लागत आहेत. लंकाबाई चक्क सतराव्या वेळी गरोदर होत्या. साधारण अडीच-तीन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात एक महिला सतराव्यांदा गरोदर असतानाही जिवंत कशी? असे अनेक प्रश्न विविध माध्यमांमधून उपस्थित झाले होते. बीड जिल्हा आरोग्य विभागाने त्या महिलेच्या आरोग्याची हमी घेतली होती. एवढेच नाही तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये लंकाबाईंचा समावेश कसा झाला नाही. हा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते.
हेही वाचा -दिलिप केंद्रे आत्महत्या प्रकरण; प्रेयसी पूजा पाटीलची २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
लंकाबाईंची या ऊसतोड कामगार असून त्यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे. त्या आपल्या पतीसह कर्नाटकातील एका साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेल्या होत्या. माजलगाव ते कर्नाटक असा प्रवास ट्रॅक्टरमधून केल्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडात जाईपर्यंत लंकाबाई खरात यांचे पोटातील बाळ पोटातच मृत झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी दिली आहे.
हेही वाचा -गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार
सौंदरमल म्हणाल्या, की लंकाबाई या माजलगाव येथील रहिवासी असून त्यांचे संपूर्ण कुटुंब शहराजवळच पाल ठोकून राहते. तीन महिन्यांपूर्वी त्या सतराव्यांदा गरोदर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी लंकाबाईंच्या आरोग्याची काळजी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने घेतली. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी लंकाबाई आणि तिचे संपूर्ण कुटुंब ऊसतोडणीसाठी कर्नाटकामध्ये गेल्यामुळे तिचा आणि माझा संपर्क तुटला. माजलगाव ते कर्नाटक या दरम्यानचा प्रवास ट्रॅक्टरमधून केल्यामुळे लंकाबाईच्या पोटातील बाळ मृतावस्थेत जन्माला आले. दरम्यान, कर्नाटकमधील संकेश्वर साखर कारखान्याची उचल लंकाबाई आणि त्यांच्या पतीने घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी सांगितले.