महाराष्ट्र

maharashtra

बीड जिल्ह्यात 21, 22 मार्चला अत्यावश्यक बाबी सोडता सर्व बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By

Published : Mar 21, 2020, 1:58 AM IST

21 आणि 22 मार्च ला अत्यावश्यक सेवा आणि आस्थापना सोडता जिल्ह्यातील इतर सर्व कार्यालये आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

beed collector
जिल्हाधिकारी कार्यालय

बीड -कोरोना विषाणूचा संसर्ग (Covid-19) रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने 21 आणि 22 मार्च रोजी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. हा आदेश शुक्रवारी रात्री 12 पासून लागू होणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -सरकारचा 'हा' निर्णय लागू होण्यापूर्वीच मंत्रालयात शुकशुकाट

आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सर्व उपविभागीय अधिकारी, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, सर्व तहसिलदार, सर्व संबंधीत नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांची असणार आहे.

काय सुरू राहील आणि काय बंद राहील?

अत्यावश्यक सेवा आणि आस्थापना म्हणजेच, शासकीय/निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे, मिडिया, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना वगळून सर्व आस्थापना दोन दिवस बंद राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details