परळी (बीड) :बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील नागापूर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या बांधकामासाठी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळा बांधणे हे मंदिर उभारण्याइतकेच पवित्र व राष्ट्रीय कार्य असून, यासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य, शिक्षण यासह पायाभूत सुविधांच्या निर्माणासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मा. मुंडे साहेब यांच्या माध्यमातून निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन यावेळी बोलताना अजय मुंडे यांनी केले.