महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! सर्रास सुरू आहेत परळी तालुक्यातील वीटभट्ट्या

परळी तालुक्यातील या वीटभट्ट्यांवर परराज्यातील मजूर काम करतात. त्या मजुरांना मजुरांकडून वीटभट्टीमालक काम करून घेत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा धोका होऊ शकतो.

brick factory is contune
धक्कादायक..! परळी तालुक्यातील वीट भट्ट्या सर्रास सुरू

By

Published : Mar 29, 2020, 5:26 PM IST

बीड -परळी तालुक्यामध्ये दोन ते अडीच हजार वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्टीवर परराज्यातील कामगार काम करतात. सध्या कोरोना विषाणूसंदर्भाने खबरदारी म्हणून, संपूर्ण देशभरात संचारबंदी करण्याली आली आहे. मात्र, परळी येथे वीट भट्ट्यांवर मजूर आज (रविवारी) काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गांभीर्य नसलेल्या वीटभट्टी मालकांविरोधात जिल्हा प्रशासनाने अजून कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक..! परळी तालुक्यातील वीटभट्ट्या सर्रास सुरू
परजिल्ह्यामधून आणि इतर राज्यातून कामासाठी आलेले मजूर मागच्या 15 दिवसामध्ये आपल्या मूळ गावी जाऊन परतदेखील आलेले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या फैलावासंदर्भात अधिक शक्यता निर्माण होते. लॉकडाऊन सुरू होऊन पाच ते सहा दिवस झाले एवढ्या दिवसात परळी तालुक्यातील वीटभट्ट्या बंद का केल्या नाहीत, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
धक्कादायक..! परळी तालुक्यातील वीट भट्ट्या सर्रास सुरू
विशेष म्हणजे परळी तालुक्यातील या वीटभट्ट्यांवर परराज्यातील मजून काम करतात. त्या मजुरांकडून वीटभट्टीमालक काम करून घेत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा धोका होऊ शकतो. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
धक्कादायक..! परळी तालुक्यातील वीट भट्ट्या सर्रास सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details