बीड- वयाच्या एकोणविसाव्या वर्षीच पूर्वीची एक बायको असलेल्या 40 वर्षाच्या व्यक्तीशी संगीता जाधवचे लग्न झाले. लग्नानंतर 2 वर्षातच नशिबी वैधव्य आले. दरम्यान, एक मुलगी झाली. पतीच्या निधनानंतर जगायचे कसे? मुलीचा सांभाळ करायचा कसा?, खायचे काय? असे अनेक प्रश्न समोर होते. मात्र, त्या परिस्थितीचा सामना करुन स्वत:च्या हिमतीवर संगीता उभी राहिली आहे.
संगीताचा संघर्ष; पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने उभा केला व्यवसाय - sangeeta jadhav news
संगीताचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वडाळा आहे (हल्ली मुक्काम बीड). लग्नाअगोदर संगीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हुंडा द्यायला पैसे नव्हते. लग्नानंतर दोन वर्षांनी पती गेल्याने ती खचून गेली.
हेही वाचा-रजनीकांत यांनी फेटाळले 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'वेळी अपघात झाल्याचे वृत्त
संगीताचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वडाळा आहे (हल्ली मुक्काम बीड). लग्नाअगोदर संगीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हुंडा द्यायला पैसे नव्हते. लग्नानंतर दोन वर्षांनी पती गेल्याने ती खचून गेली. दरम्यान, तिची एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांच्याशी भेट झाली. संगीताने घर बसल्या उद्योग करण्याचे निश्चित केले. बचत गटाकडून कर्ज घेऊन शिवन क्लास, ब्युटी पार्लर व छोटे कपड्याचे दुकान राहत्या घरीच त्यांनी सुरू केले.
पतीच्या निधनानंतर सुरुवातीच्या काळात शेतात काबाडकष्ट करून संगीताने मुलीचे पालन पोषण केले. पुढे, बचत गटाच्या अर्थसाह्यामुळे संगीताला नवी दिशा मिळाली. आज घडीला संगीताने चांगले भांडवल उभे केले असून स्वाभिमानाने जगण्याचा आनंद मला मिळत असल्याचे ती सांगते. स्वतःच्या पायावर उभा राहण्याची किमया संगीताने करुन दाखवली आहे. या सगळ्या संघर्षात शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ झाला नाही, अशी खंत संगीताने व्यक्त केली.