महाराष्ट्र

maharashtra

Beed Road Accident : धुळे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या मांजरसुंबा घाटात अपघात; महिलेचा जागीच मृत्यू

By

Published : Jan 27, 2023, 7:56 AM IST

Updated : Jan 27, 2023, 9:12 AM IST

बीड जवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. बीड जिल्ह्यात मांजरसुंबा येथून बीडच्या दिशेने येत असलेल्या मालवाहतूक आप्पे रिक्षाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

Manjarsumba Ghat Accident
मांजरसुंबा घाट अपघात

बीड : बीड जिल्ह्यात एकीकडे रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आहे. जिल्ह्यातील अनेक लोक रोजगार निमित्त बाहेरगावी जातात अनेक लोक ऊस तोडणीसाठी जातात. त्यामुळे आपली उपजीविका भागवण्यासाठी काहीतरी धडपड इथल्या नागरिकांना करावी लागते. बीडच्या प्रकाश आंबेडकर नगर मधील गंगुबाई रोकडे या आपली उपजीविका भागवण्यासाठी भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होत्या. सकाळपासून या महिला भंगार गोळा करून बीडकडे येत होत्या. मात्र बीडकडे येत असतानाच पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षातील गंगुबाई रोकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.



कसा झाला अपघात :मांजरसुंबा येथून बीडच्या दिशेने येत असलेल्या मालवाहतूक आप्पे रिक्षाला कंटेनरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एक महिला जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना बीड-मांजरसुंबा रस्त्यावर कोळवाडी फाट्यावर घडली आहे. धडक देऊन चालकाने कंटेनर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु बीड ग्रामीण पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करत असताना हा अपघात पोलिसांच्या निदर्शनास आला व त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्या ठिकाणावरून कंटेनर चालक पळून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी कंटेनरचा पाठलाग करून कंटेनर पाडळसिंगी जवळ पकडून ताब्यात घेतला.



कंटेनर चालकाने काढला होता पळ :हा अपघात एवढा विचित्र होता की त्या अपघातात मृत गंगुबाई रोकडे वय ४० वर्ष , राहणार प्रकाश आंबेडकर नगर या भागात राहतात. त्या भंगार गोळा करून उपजीविका भागवितात. त्या अन्य दोन महिलांसह मालवाहतूक अॅपे रिक्षा क्र. एम.एच. २० एस टी २०५७ मध्ये भंगार गोळा करुन मांजरसुंबाकडून बीड शहराकडे येत होत्या. त्याचवेळी कोळवाडी फाट्याजवळ आले असता अॅपे रिक्षाला कंटनरने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचे दोन तुकडे झाले. यामध्ये गंगुबाई रोकडे या ठार झाल्या. अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 4 जानेवारीला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यामध्ये पाच दुचाकींचा चक्काचूर झाला होता. राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला होता.

हेही वाचा : Palamu Accident भरधाव स्कॉर्पिओने चिमुकल्यांना चिरडले चार चिमुकल्यांचा करुण अंत चालकाचाही मृत्यू

Last Updated : Jan 27, 2023, 9:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details