बीड - शहरातील शिराळे गल्ली येथे एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. मृत विवाहीतेचे नाव दीपाली रोहीत शिराळे असे आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या नवविवाहितेच्या माहेरी शिवनी येथे तिच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत लिहीलेल्या मजकुरावरुन त्या नवविवाहितेची आत्महत्या की हत्या याचा पोलीस तपास करत आहेत. या चिठ्ठीमध्ये बीड जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा असे म्हटले आहे.
बीडमध्ये नवविवाहितेची आत्महत्या; माहेरी सापडलेल्या चिठ्ठीवरुन संभ्रम - suicide note
बीडमध्ये एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृतकेच्या माहेरी तिच्याच हस्ताक्षरातील एक चिठ्ठी सापडली ज्यात तिने सासरचे तिचा छळ करत असल्याचा उल्लेख केला आहे. या चिठ्ठीवरुन तिची तीची हत्या कि आत्महत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
शिवनी येथील दीपालीचे बीड येथील रोहित मारुती शिराळे(23) याच्याशी 26 एप्रिल 2019 रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या एक महिन्यानंतर सासरकडील मंडळी दिपालीचा छळ करत असल्याचे तिच्या माहेरी सापडलेल्या चिठ्ठीवरून समोर येत आहे. दीपालीने 9 जून 2019 रोजी ही चिठ्ठी लिहिलेली लिहिली आहे. यात सासरा मारुती दगडू शिराळे, सासू आशाबाई मारुती शिराळे, नवरा रोहित मारुती सिराळे हे मला प्रचंड छळतात. माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन पोटातील बाळाला देखील मारून टाकले आहे. तसेच माझ्या वडिलांची गरीब परिस्थिती असताना देखील पाच लाख रुपये खर्च करून माझे थाटात लग्न करून दिले. मला सासरच्या मंडळीकडून घटस्फोट हवा आहे. लग्नाचा झालेला खर्च व मला झालेला मनस्ताप असा एकूण दहा लाखाचा खर्च माझ्या वडिलांना द्यावा व मला मोकळे करावे असे दीपालीच्या हस्ताक्षरातील सापडलेल्या या चिठ्ठीत म्हटले आहे.
चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून पोलीस ती चिठ्ठी दिपाली शिराळे हिनेच लिहिली आहे का? याचा तपास करत असल्याचे तपासी अधिकारी मनीषा जोगदंड हिने सांगितले. तर, माहेरकडील मंडळींनी दीपालीच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असे, म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.