बीडमध्ये ८ विद्यार्थ्यांना चिवड्यातून विषबाधा; उपचार सुरू - उपचार
केज तालुक्यातील शिरुर येथे योगेश्वरी मुलांचे वसतिगृह आहे. या मुलांनी आज घरून आणलेला चिवडा आणि करंजी खाल्ली होती. त्यानंतर त्यांना अचानक उलटी, मळमळ होऊ लागली. या घटनेची माहिती मिळताच वसतिगृह अधीक्षकांनी त्यांना तत्काळ नांदूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा उपनगरात गुरुवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले.
बीडमध्ये ८ विद्यार्थ्यांना चिवड्यातून विषबाधा; उपचार सुरू
बीड- केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांच्या वसतिगृहातील ८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या मुलांनी चिवडा आणि करंजी खाल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या सर्व विषबाधित मुलांवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.